कोविड_19_अर्थात_कोरोना_आणि_मी: एक_यशस्वी_लढा!
कोविड_19_अर्थात_कोरोना_आणि_मी : एक_यशस्वी_लढा ! प्रणाम! मी प्रा. डॉ. सुधीर मठपती.....मी कोविड -19/ कोरोना या आजारातून ठिक होऊन घरी परतलो आहे. माझ्या काही जवळच्या मित्रांनी आग्रह अर्थात हट्ट केला की मी माझे अनुभव व एकंदरीत हा प्रवास शब्दामध्ये मांडावा आणि सर्वांशी शेअर करावा. मित्रांचा हट्ट तर पूर्ण करावाच लागणार कारण त्यांच्या मैत्रीच्या अस्तित्वाशिवाय आपल्या अस्तित्वाला अर्थ नाही. दुपारचे साधारण 3 वाजले असतील. एका अनोळखी नंबरवरुन फोन आला आणि मी रिसिव करताच मला समोरच्या व्यक्तीने विचारले की आपले नाव xxx च का? आपला पत्ता xxx आहे का? मी त्यांना होकार देताच त्यांनी मला सांगितले की आपली Rt. PCR टेस्ट पाॅजिटिव आली आहे आणि आपणास तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे लागले. मी अगदी शांत चितांने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच बोलन एकत होतो आणि डोळ्यासमोर दिसत होती ती फक्त आणि फक्त माझ्या रुममध्ये माझ्या अभ्यासाच्या टेबलावर ठेवलेली माझ्यासाठी एक दिशादर्शक, प्रेरणास्थान व आशिर्वादरुपी समुद्र असणाऱ्या माझ्या आजीचा (मायचा) फोटो आणि अंतर्मनाच्या पटलावर एका नंतर एक येणाऱ्या...