Posts

Showing posts from 2025

सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांच्या धैर्याला, आत्मविश्वासाला व प्रामाणिक संशोधनक वृत्तीला मनःपूर्वक सलाम!

  सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांच्या धैर्याला, आत्मविश्वासाला व प्रामाणिक संशोधनक वृत्तीला मनःपूर्वक सलाम! नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांनी 5 जून 2024 रोजी बोईंगच्या स्टारलायनर अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे 8 दिवसांच्या मोहिमेसाठी प्रस्थान केले होते.    मात्र, अंतराळयानातील तांत्रिक बिघाडामुळे त्यांना अंतराळात 9 महिने 13 दिवस थांबावे लागले. आज आपल्या संर्वासाठी खूप आनंदी दिवस आहे. अवकाशाच्या अथांग शून्यात, जिथे कदाचित केवळ सहवास होता फक्त आणि फक्त ताऱ्यांचा. अश्या परिस्थितीत सुद्धा सुनीता विल्यम्स यांनी आपला संशोधनाचा व अस्तित्वाचा संघर्ष चालूच ठेवला.  या 9 महिण्यापेक्षा जास्त चाललेल्या संघर्ष्यादरम्यान सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांचे शरीर अंतराळात होतं पण त्यांचे हृदय मात्र पृथ्वीच्या कुशीत धडधडत होतं. फक्त 8 दिवसासाठी अंतराळात असलेले वास्तव्य एका तांत्रिक बिघाडामुळे चिरकाळासाठी भविष्याच्या गर्तेत लोटले गेले. ... हा चिरकाळ नऊ महिने तेरा दिवसानंतर संपुष्ठात आला.    अंतराळाच्या अगद...