“आध्यात्मिक साहित्यातील आदर्श जीवन पद्धती प्रत्यक्षात जगणारे एक निखळ व्यक्तीमत्व”
“ आध्यात्मिक साहित्यातील आदर्श जीवन पद्धती प्रत्यक्षात जगणारे एक निखळ व्यक्तीमत्व ” लातूर मधील प्रसिद्ध उद्योजक तथा समाज कार्यात सदैव अग्रेसर असणारे व्यक्तिमत्त्व , माझे स्नेही , आदरणीय श्री. श्रीकांतजी चंद्रशेखर हिरेमठ यांच्या सहवासात निखळ मैत्री , आदर , जिव्हाळा , काळजी व ऋणानुबंध या सर्व समाज जीवनातील असाधारण पण अत्यंत गरजेच्या असणाऱ्या या सर्व घटकांचा आनंद व अनुभव घेत असतानाच या निमित्ताने त्यांच्या कुटुंबियां सोबत सुद्धा तसाच ऋणानुबंध घट्ट होत गेला. हा ऋणानुबंध कमी कालावधीत इतका घट्ट होण्यामागचा मुख्य प्रवाह म्हणजे त्यांच्या मातोश्री , आमच्या पूज्य आजी , अर्थात , कै. चंद्रकलाबाई हिरेमठ यांना ईश्वरी सान्निध्यात जाऊन पहाता पहाता एक वर्षाचा काळ लोटला. पूज्य आजीच्या या प्रथम पुण्य स्मरणाचे औचित्य साधत त्यांच्या आठवणींना किंबहुना त्यांच्या सहवासात घालविलेल्या अमुल्य क्षणांना व मी अनुभवलेली आजी या अनुभवरुपी भावनां शब्दरुपी अस्तित्वात उतरविण्याची विनंती हिरेमठ परिवाराकडुन करण्यात आली आणि खरच माझ्या मनाची एक वेगळीच अवस्था झाली. एका अर्थाने प्रचंड आनंद झाला की पूज्य आजीच्य...