सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांच्या धैर्याला, आत्मविश्वासाला व प्रामाणिक संशोधनक वृत्तीला मनःपूर्वक सलाम!

 सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांच्या धैर्याला, आत्मविश्वासाला व प्रामाणिक संशोधनक वृत्तीला मनःपूर्वक सलाम!



नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांनी 5 जून 2024 रोजी बोईंगच्या स्टारलायनर अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे 8 दिवसांच्या मोहिमेसाठी प्रस्थान केले होते.  मात्र, अंतराळयानातील तांत्रिक बिघाडामुळे त्यांना अंतराळात 9 महिने 13 दिवस थांबावे लागले.

आज आपल्या संर्वासाठी खूप आनंदी दिवस आहे. अवकाशाच्या अथांग शून्यात, जिथे कदाचित केवळ सहवास होता फक्त आणि फक्त ताऱ्यांचा. अश्या परिस्थितीत सुद्धा सुनीता विल्यम्स यांनी आपला संशोधनाचा व अस्तित्वाचा संघर्ष चालूच ठेवला. 

या 9 महिण्यापेक्षा जास्त चाललेल्या संघर्ष्यादरम्यान सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांचे शरीर अंतराळात होतं पण त्यांचे हृदय मात्र पृथ्वीच्या कुशीत धडधडत होतं. फक्त 8 दिवसासाठी अंतराळात असलेले वास्तव्य एका तांत्रिक बिघाडामुळे चिरकाळासाठी भविष्याच्या गर्तेत लोटले गेले. ...

हा चिरकाळ नऊ महिने तेरा दिवसानंतर संपुष्ठात आला.  अंतराळाच्या अगदी नीरव शांततेत, एकांतपणाच्या खोल गर्तेत, अनिश्चिततेच्या काळोखात स्वतः मधील संशोधक वृत्ती जागृत ठेवून शांत, संयमाने व धाडसने सकारात्मक विचार जोपासणे व  विविध प्रयोग चालू ठेवणे हे खरंच कल्पने पलीकडील आहे… 

पण एक मात्र नक्की त्ते दोघेही खचल्ले नाहीत. कधीही नैराश्याच्या गर्तेत हरवले नाहीत. आपला दिनक्रम ठरल्याप्रमाणे चालूच ठेवत प्रत्येक श्वासागणिक स्वतःला मजबूत करत गेले. स्वतःच्या मनोधैर्यावर विश्वास ठेवत संशोधनाचा यज्ञ तेवत ठेवला. प्रथ्वीकडे परतण्याच्या वेदनादाई प्रतीक्षेचा प्रत्येक क्षण संयमाने आणि जिद्दीने जगले. खरंच आपल्या धैर्याला व त्यागाला मनःपूर्वक सलाम! 🙏

आपण सुखरूप पृथ्वीवर परत यावे  यासाठी अगणित हृदये प्रार्थना करत होती. तुमच्या साहसाच्या, त्यागाच्या व पराक्रमाच्या शौर्य कथा सर्वत्र सांगितल्या जात होत्या आणि मग, अखेर तो क्षण आलाच  ज्याची आम्ही सर्व आतुरतेने वाट पाहात होतो…

अखेर पहाटेच्या म्लान प्रकाशात, अवकाशयान पृथ्वीच्या दिशेने झेपावलं.

आज भारतीय प्रमाणवेळेनुसार 19 मार्च 2025 रोजी पहाटे 3:27 वाजता, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे परतले.  हृदयाचे ठोके वेगाने वाढले, डोळ्यांत उत्कंठेचे अश्रू दाटले, घसा कोरडा पडला आणि अखेर ती क्षणभरी थरारक वाट पाहून, धाडसाने मृत्यूच्या उंबरठ्यावर चाल करून जाणारे ते योद्धे सुखरूप पृथ्वीवर परतले !

हा विजय होता संयमाचा! हा विजय होता धैर्याचा! हा विजय होता आत्मविश्वासाचा! हा विजय होता विज्ञानाचा! 

सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांनी 9 महिण्यापेक्षा जास्त काळ अंतराळात राहून एकमेकांना प्रोत्साहन व आत्मविश्वास देत जगाला एक ऐतिहासिक, रचनात्मक व प्रेरणादायी संदेश दिला आणि तो म्हणजे संकटे, अडचणी कितीही आल्या, यशाच्या शिखराची वाट कितीही अवघड असो, पण जर जिद्द असेल,  प्रामाणिक प्रयत्न असतील व सोबतीला सच्चा मित्र किंवा साथीदार असेल तर जगातच काय अंतराळात सुद्धा काहीही अशक्य नाही!

या अविस्मरणीय पराक्रमाला, त्यांच्या धैर्याला, संयमाला, आणि जिद्दीला मनःपूर्वक सलाम! 

🚀🌍🙏


Comments

Popular posts from this blog

Submission is open for the Vol.-V, Issue-2, September 2024

“आध्यात्मिक साहित्यातील आदर्श जीवन पद्धती प्रत्यक्षात जगणारे एक निखळ व्यक्तीमत्व”